नोकरी व रोजगाराच्या संधी

0
नोकरी व रोजगाराच्या संधी

नोकरीच्या, रोजगाराच्या शोधार्थ इतरत्र स्थलांतरित होणार्‍या सोलापूर जिल्ह्यामधील तरुणांना सोलापुरातच नोकरी आणि रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणे हे सोलापूर सोशल फाऊंडेशनचे प्राथमिक उद्दीष्ट आहे.

सोलापूर जिल्हा एकेकाळी कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असे. कापड उद्योग, वस्त्रोद्योग, विडी उद्योग यांसारख्या अनेक उद्योगांमुळे येथे खेड्यापाड्यातील अनेक कामगारांना रोजगार मिळत असे. सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण, बुद्धिमत्ता, कौशल्य असणारा समाज विविध कारणांमुळे जिल्ह्याबाहेर स्थलांतरित होऊ लागला. यामुळे स्थलांतरामुळे सोलापुरात नवीन उद्योगांच्या स्थापना होण्याच्या शक्यता कमी होऊ लागल्या. व्यवसाय व उद्योग कमी होऊ लागल्याने सर्वच स्तरातील नोकरीच्या संधी घटू लागल्या.

सोलापूर जिल्ह्यातील तरुणांचे नोकरी किंवा रोजगारासाठी सोलापूर जिल्हयाबाहेर होणारे स्थलांतर थांबावे यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये नवीन मोठे उद्योग स्थापन होण्यास प्रोत्साहन देणे, जिल्ह्यातील तरुणांना विविध व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देणे अशा अनेक योजना सोलापूर सोशल फाउंडेशन राबवित आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये IT इंडस्ट्रीजची वाढ व्हावी यासाठीही सोलापूर सोशल फाऊंडेशन प्रयत्नशील आहे.

IT इंडस्ट्रीज आणि इतर मोठ्या इंडस्ट्रीज वाढू लागल्या की त्याद्वारे अनेक सुशिक्षित तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ लागतील. नोकरी व रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या की त्यामुळे उत्पन्नात वाढ होईल, उत्पन्नात वाढ झाली की जनसामान्यांचे राहणीमानही उंचावेल. यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागेल.