मल्टिप्लेक्सची संकल्पना प्रथम सोलापुरात

उमाच्या उद्घाटनालाच ङ्गसंगमम चित्रपटाचा प्रिमियर शो ठेवला. यासाठी अभिनेत्री वैजयंतीमाला वगळता या चित्रपटातील अभिनेते राज कपूर, राजेंद्रकुमार, संगीतकार जयकिशन, इफ्तेखान, मनमोहन कृष्ण यांच्यासह झाडून सारे कलावंत आले होते.

90 दशकांपूर्वी कामगारवर्गाच्या आयुष्यात तीन तास निखळ मनोरंजन करून ताजेतवाने करण्याचे काम चित्रपटांनी मोठ्या प्रमाणात केले. शंकरराव भागवत यांनी 1930 ते 35 काळात चित्रमंदिराची वास्तू उभारली. 1942 साली छायामंदिर, 1944 साली कलामंदिरची उभारणी केली. 64 ला उमा चित्रपटगृहाची निर्मिती झाली. मुंबईच्या मिनर्व्हानंतर उमामंदिर महाराष्ट्रातील दोन नंबरचे चित्रपटगृह होते. अलीकडच्या काळात पुणे-मुंबईत सर्व काही एका छताखाली देण्यासाठी मल्टिप्लेक्स सुरु झाले आहेत. मात्र त्याही पूर्वी 1960 च्या दशकात ही संकल्पना आशिया खंडात सर्वप्रथम भागवत परिवाराने राबविली. 1964 साली भागवत थिएटरने एकावर एक अशी 4 चित्रपटगृहे सोलापुरात उभारली.

Share: