यमाईदेवी, मार्डी

महाराष्ट्राची कुलदेवता तुळजाभवानी देवीची मोठी बहीण म्हणजे मार्डीची यमाईदेवी. सोलापूर शहराच्या उत्तर दिशेला 22 किलोमीटर अंतरावर मार्डी हे गाव आहे. सुमारे 800 वर्षांपूर्वी बांधलेले हेमाडपंती मंदिर येथे आहे. मंदिरात साडेआठ फूट उंचीची यमाईदेवीची स्वयंभू मूर्ती आहे. संपूर्ण राज्यात या देवीची ख्याती असून वर्षभर भाविक येत असतात. रंगनाथ स्वामींची भक्ती पाहून यमाईदेवी मार्डीत प्रकटल्याची आख्यायिका सांगितली जाते. 800 वर्षांपूर्वी हे मंदिर महांकालेश्वराचे होते. परंतु, महांकालेश्वरांनी यमाईदेवीला हे स्थान दिल्याचे म्हटले जाते. दरवर्षी चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने भाविक येतात. हे एक अत्यंत जागृत देवस्थान आहे.

Share: