शीक मटण

सोलापुरात मटण भाजनालय प्रसिद्ध आहे. लोक भाजनालयात मटण घेऊन जातात. तिथं ते भाजलं जातं आणि लोणी घालून गरम भाकरीबरोबर खायला दिलं जातं. सोलापुरी भाषेत याला शीक मटण म्हणतात. विजापूर वेस परिसरात अशी भाजनालये आहेत. केवळ सोलापुरातूनच नाही तर अनेक सेलिब्रिटी मुंबई व पुण्यातून खास शीक मटण खाण्यासाठी सोलापुरात हजेरी लावतात. सोलापुरी सावजी मटण उंडे, खिम्याचे उंडे, मटण आचार बनवतात. हे सावजी विदर्भात असतं तसं झणझणीत, काळसर नसतं, चविष्ट असतं पण तिखट नसतं. सोलापूरचा हा प्रभाव.

Share: