अणदूर

अणदूर याचे मूळ नाव आनंदपूर. अणदूर व नळदुर्ग मिळून खंडोबाचे एकच स्थान मानले जाते. अणदूर येथे वर्षातील 10.75 महिने खंडोबा वास्तव्य करतात तर 1.75 महिने नळदुर्ग येथे वास्तव्य करतात. अणदूर येथील खंडोबा मंदिराचे बांधकामत 1739 मध्ये झाले. मंडपाचे दक्षिणेस उत्तराभिमुख गर्भगृह असून गर्भगृहात आसनावर खंडोबाचे सयानी लिंग आहे. या लिंगावर मुखवटा चढवून सजावट केलेली असते. यावर धातूची मेघडंबरी असून मागील बाजूस प्रभावळ आहे. मेघडंबरीच्या दोन्ही बाजूस खंडोबा, म्हाळसा यांच्या उभ्या मूर्ती आहेत.  

Share: