एकाच दिवशी 50 हजार क्विंटल कांद्याची आवक

कांद्यासाठी प्रसिद्ध नाशिक, लासलगावच्या बाजाराशी आज सोलापूरची कांदा बाजारपेठ स्पर्धा करते आहे. शेजारील राज्यांत दळणवळणाच्या सुलभ सोयी, शेतकर्‍यांसाठी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधा अशा बाबींमुळे आज सोलापूर कांदा मार्केट वेगाने विस्तारत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात यंदाच्या हंगामात तर कांद्याच्या दराने चांगलीच उसळी घेतली. गेल्या वर्षी तब्बल 51 हजार क्विंटल आवक एकाच दिवशी झाली अन् बाजार समितीच्या इतिहासातील आवकेचा उच्चांक मोडला. नाशिक, लासलगाव, पिंपळगाव बसवंत या राज्यातील महत्त्वाच्या कांदा बाजारपेठा आहेत. गेल्या काही वर्षांत मात्र सोलापूर बाजार समितीतील कांद्याची वाढती आवक, दरातील स्थिरता आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक यांसारख्या राज्यांची सोलापूर बाजार समितीतील कांदा खरेदीसाठी असलेली पसंती या बाबी लक्षात घेण्याजोग्या आहेत. त्यामुळेच या बाजाराशी सोलापूर बाजार समिती स्पर्धा करीत आहे.

बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील काही शेतकरी निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन करतात, उर्वरित बागायतदार स्थानिक बाजारपेठेतत विक्री करतात. दक्षिण सोलापूर, पंढरपूर, माढा, करमाळा व बार्शी या तालुक्यात बेदाणा निर्मितीवर अधिक भर आहे. द्राक्ष व बेदाणा निर्मितीतून वर्षाला 900 कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होते.

Share: