उत्तम धाग्यासाठी प्रसिद्घ सांगोला

सांगोला तालुका सहकारी सूत गिरणी उत्तम धाग्यासाठी प्रसिद्घ आहे. आशिया खंडातील सर्वोत्तम सूत गिरणी म्हणून या गिरणीचा गौरवही झाला आहे. बुद्घिहाळ इमारत, गोलघुट, अंबिका देवी मंदिर, सांगोला किल्ला ही येथील प्रसिद्घ स्थळे होत. उच्च प्रतीच्या डाळिंबांच्या उत्पन्नासाठी हे ख्यातनाम असून त्यांची परदेशांतही निर्यात होते. येथील खिलार जातीचे बैल प्रसिद्घ आहेत. राज्यातील सर्वात मोठा बैलांचा बाजार भरतो. तसेच कमी पाण्यावर आधारित शेती कशी करायची याचे उत्तम उदारण म्हणजे सांगोला तालुका आहे. माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था माता-बालके यांच्या विकासार्थ कार्यरत आहे.

जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुका व दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा तालुका म्हणजे सांगोला. एका तालुक्यातून सर्वात जास्त वेळा म्हणजे तब्बल 12 वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून जाण्याचे कर्तृत्व गणपतराव देशमुख यांनी दाखवले आहे. या गोष्टीची दखल घेत तालुक्याचे नाव गिनीज बुकात नोंदवण्यात आले आहे.

Share: