अक्कलकोट

अक्कलकोट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे प्रसिद्ध देवस्थान आहे. स्वामी समर्थ यांचे मंदिर येथे असून अक्कलकोट शहर कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्याचे हे शहर तालुक्याचे ठिकाण आहे. अक्कलकोटची २००१ सालची लोकसंख्या ३८,२१८ आहे.

स्वामी समर्थांची नगरी. अक्कलकोट हे स्वामी समर्थ भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. अक्कलकोटला स्वामींचे भव्य मंदिर व त्यांचा गावातील मठ आहे. मंदिराच्या अन्नछत्रामध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे ४/५ सहस्र भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. मंदिराची धर्मशाळा अप्रतिम आहे. अक्कलकोटचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील एक मोठे शस्त्रगृह. येथे अनेक जुन्या परंपरागत शस्त्रांचा संग्रह येथील भोसले राजघराण्याने प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवलेला आहे. वेगवेगळी खड्गे, ढाली, बर्च्या, भाले, दांडपट्टे, कुऱ्हडी, बंदुका, खंजीर इत्यादी वस्तू प्रदर्शनात ठेवल्या आहेत. प्रदर्शनात येथील राजकन्येचा लहान मुलांच्या खेळण्यातील गाड्यांचा संग्रहदेखील आहे. राजपुरुषांची सुंदर आणि रंगीत छायाचित्रे प्रदर्शनात मांडली आहेत.

अक्कलकोटच्या जवळच शिवपुरी नावाचे ठिकाण आहे. तेथील पुरोहित तिथे सकाळ संध्याकाळ हवन, यज्ञ आदी करत असतात.ह्या हवनसाठी दूरवरून लोक येतात यावर संशोधन करण्यासाठी अनेक अभ्यासक हि भेट देतात

अक्कलकोटमध्ये दोन मोठे भक्तनिवास आहेत. एक देवस्थानचा आणि एक अन्नछत्र मंडळाचा. सोयींच्या बाबतीत देवस्थानच्या भक्तनिवास थोडा उजवा आहे असे म्हणता येईल. तेथे तुमच्या गाडीच्या चालकासाठीसुद्धा सोय होते. छोटेसे उपाहारगृह, प्रशस्त खोल्या, स्वामींचे जीवनदर्शन घडवणारे छोटेसे कायमस्वरूपी संग्रहालय या गोष्टी आहेत. अक्कलकोट मध्ये आता नवीन अन्नछत्र उभारण्यात आले आहे.

अक्कलकोटचे प्रमुख संस्थानिक 
  • १७०७-१७६०- फतेहसिंहराजे भोंसले
  • १७६०-१७८९ - शहाजी (बाळासाहेबराजे) भोसले
  • १७८९-१८२२ - दुसरे फतेहसिंह (अप्पासाहेबराजे) भोंसले
  • १८२२-२३ - मलोजी (बाबासाहेब) भोसले
  • १८२३-१८५७ - दुसरा शिवाजी (अप्पासाहेबराजे) भोसले
  • १८५७-१८७० - दुसरे मालोजी (बुबासाहेब) भोसले
  • १८७०-१८९६ - तिसरा शिवाजी (बाबासाहेबराजे) भोसले
  • १८९५-१९२३- कॅप्टन फतेहसिंह(तिसरे) भोसले
  • १९२३-१९५२ - विजयसंहराव भोसले
  • १९५२-१९६५ - जयसिंहराव भोसले

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरातच वल्लभभाई पटेलांनी अक्कलकोट संस्थान भारतात विलीन केले आणि मुंबई इलाख्यात दाखल केले. भाषावार प्रांतरचना झाल्यावर अक्कलकोट आणि त्याचा सातारा जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.

Share: