महिला विकास व सक्षमीकरण

0
महिला विकास व सक्षमीकरण

सोलापूर जिल्ह्यातील महिलांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या विशेष संधी उपलब्ध करून देण्यातून महिलांचा विकास साधला जाईल. महिला सक्षम व्हाव्यात, स्वयंपूर्ण व्हाव्यात यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन प्रयत्नशील आहे.

आज २१व्या शतकात स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर दिसून येतात. कष्ट घेण्याची वृत्ती, सहनशीलता, प्रामाणिकपणा, सामंजस्य, झटून काम करण्याची वृत्ती हे गुण स्त्रियांमध्ये उपजतच आढळून येतात. कुटुंबाचा पाठिंबा आणि प्रेरणा मिळाली तर त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

शैक्षणिक क्षेत्र, कलाकौशल्य, नोकरी किंवा व्यवसाय यांपैकी सर्वच क्षेत्रांत स्त्रिया वेगाने प्रगती करताना दिसून येतात. सोलापूर सोशल फाऊंडेशन महिला विकासासाठी प्रयत्नशील आहे. महिला विकासमधील सर्वात प्रमुख घटक म्हणजे शिक्षण. सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावे, सर्व खेड्यातील मुलींना, स्त्रियांना प्राथमिक शिक्षणाच्या उत्तम सोयी उपलब्ध असाव्यात. प्राथमिक शिक्षणाबरोबरच माध्यमिक व उच्च शिक्षणही त्यांना मिळायला हवे. जिल्ह्यातील कोणत्याही स्त्रीने शिक्षणापासून वंचित राहू नये. हे या संस्थेचे ध्येय आहे.

शिक्षणाबरोबरच महत्वाच्या आहेत त्या कौशल्य विकासाच्या संधी. महिलांमधील अंगभूत कौशल्याला योग्य दिशा मिळाली तर याच कौशल्याचा रोजगार मिळविण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. स्त्रियांसाठी नोकरी, कलाकौशल्य तसेच व्यवसायाच्या पुरेशा संधी सोलापूर जिल्ह्यात निर्माण झाल्या तर स्त्रिया आपल्या पायावर उभ्या राहू शकतील, सक्षम बनतील. यासाठी व्यवसाय प्रशिक्षण, अर्थसहाय्य यांद्वारे पाठबळ देण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन कटिबद्ध आहे.