सोलापूर सोशल फाऊंडेशन
सोलापूर फेस्ट - मुंबई
'सोलापूर फेस्ट' च्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या संस्कृतीचे मुंबईत दर्शन...
सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध उत्पादनांना सोलापूर बाहेर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नवी मुंबईत आयोजित केलेल्या 'सोलापूर फेस्ट' २०१९ ला दीड लाखाहून अधिक मुंबईकरांनी भेट दिली.
सोलापूर सोशल फाऊंडेशन :
सोलापूरकरांच्या एकजुटीचे एक नवे पर्व...
सोलापूरचा सर्वांगीण विकास आणि त्यासाठी पुण्यातील सोलापूरकरांची एकजूट घडवून आणण्याच्या दृष्टीने सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या मेळाव्याला पुण्यातील सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. काल, रविवार दि. १६ डिसेंबर रोजी पंडित फार्मस्, पुणे येथे सहकार मंत्री मा. ना. श्री सुभाष(बापू) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
सोलापूर सोशल फाऊंडेशन :
तेजोमय स्वर
आनंदमयी सोहळा प्रसन्न पहाटेचा
प्रसन्न उषःकाळी सूर सुमधुर संगीताचा
स्थळ : रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड गाव, पिंपरी चिंचवड
दिनांक : ६ जानेवारी २०१८, पहाटे ६:३०
मराठी व हिंदी भावगीते तसेच भक्तीगीतांची सुरेल मैफल.
सोलापूर फेस्ट:
मान्यवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती
सोलापूर फेस्टला मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भली व त्यांच्या हस्ते 'श्रीमंती सोलापूरची' या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही झाले. "सोलापूर जिल्हा नेहेमीच आपली विशेष छाप उमटवतो, इथली खाद्यसंस्कृती मला विशेष भावते" या शब्दांत त्यांनी सोलापूरचे कौतुक केले.
सोलापूर फेस्ट:
सोलापूर फेस्टमध्ये पुणेकरांचा उत्साह
सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे १६ ते १८ डिसेंबर २०१८ या कालावधीत पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'सोलापूर फेस्ट' या भव्य प्रदर्शनाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. खास सोलापुरी उत्पादनांच्या मनसोक्त खरेदीसह चवदार सोलापुरी खाद्यपदार्थांचा आस्वाद तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सोलापूर फेस्ट:
पवित्र अग्निहोत्राची मंगल अनुभूती
पुण्यातील नागरिकांना सोलापूर जिल्ह्यातील शिवपुरी येथील अग्निहोत्राचा मंगल अनुभव सोलापूर फेस्टमध्ये घेता आला. अग्निहोत्रामुळे वातावरण चैतन्यदायी आणि शुद्ध होते. मा. ना. श्री. सुभाष देशमुख (बापू) यांच्यासह ३०० जण या अग्निहोत्रामध्ये सहभागी झाले होते. या निमित्ताने सर्वांनाच एक पवित्र अनुभूती प्राप्त झाली.
सोलापूर फेस्ट:
रसिकांची मने जिंकणारा हास्यकल्लोळ
सोलापूर फेस्टमध्ये पहिल्या दिवशी सायंकाळी प्रा. दीपक देशपांडे यांच्या सोलापुरी शैलीतील 'हास्यकल्लोळ' या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचे हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांनी पुणेकर रसिकांना खळखळून हसविले. आपल्या खास नर्मविनोदी शैलीने रसिकांना हसवित निखळ मनोरंजन करणार्या प्रा. दीपक देशपांडे यांनी सर्वांची मने जिंकून घेतली.
स्वयंसेवक व्हा
सोलापूर फेस्टसाठी द्या तुमचेही योगदान. स्वयंसेवक व्हा आणि सोलापूर फेस्टच्या माध्यमातून आपल्या सोलापूर जिल्हयाच्या उन्नतीसाठी तुमचाही हातभार लावा.
रजिस्टर करा !