सोलापूर फेस्ट नोव्हेंबर २०१८, पुणे

१६ ते १८ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत पुण्यातील पंडित फार्मस् येथे 'सोलापूर फेस्ट' संपन्न झाले. सोलापूर सोशल फाऊंडेशन आयोजित 'सोलापूर फेस्ट' म्हणजे सोलापूरची सर्वांगीण माहिती देणारे, खाद्य जत्रा व खरेदीची रेलचेल असणारे भव्य प्रदर्शन व महोत्सव... सोलापूर फेस्ट म्हणजे सोलापूरविषयी सर्व काही!

समृद्ध असा धार्मिक, ऐतिहासिक, नैसर्गिक व व्यावसायिक वारसा लाभलेला सोलापूर जिल्हा.

सोलापूर म्हणलं की पटकन आठवते ती सोलापुरी चादर. घट्ट वीण, मजबूत धागे आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन असणारी सोलापुरी चादर आज जगभर प्रसिद्धी पावली आहे. घराघरात आपलं महत्व राखणारी ही चादर असो वा सोलापुरी पंचे, वस्त्रोद्योगांचे शहर अशी ओळख राखणार्याा सोलापूरची खासियत असणारे सर्व प्रकार येथे उपलब्ध होते. याचबरोबर मनसोक्त खरेदी करण्यासाठी सोलापूरची अनेक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने येथे उपलब्ध होती.

सोलापूर जिल्हा प्रसिद्ध आहे तो आपल्या आगळ्या वेगळ्या खाद्यसंस्कृतीसाठी. शेंगा चटणी, कडक भाकरी या पदार्थांच्या नुसत्या नावानेच तोंडाला पाणी सुटते ना? जगभरच्या खवय्यांना भुरळ घालणार्याी अफलातून चवीच्या अनेक पदार्थांची मेजवानी सोलापूर फेस्टच्या खाद्यजत्रेमध्ये अनुभवता आली. सोलापूरचे अनेक खास पदार्थ चाखण्यासाठी, खरेदी करण्यासाठी नागरिकांनी सोलापूर फेस्टला भेट दिली.
येथे भेट देणार्याे नागरिकांना सोलापूर जिल्ह्यातील कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंदही घेता आला. प्रा. दीपक देशपांडे यांचा हास्यकल्लोळ, नृत्य संगीत व पहाटगाणी या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली.

पहिले सोलापूर फेस्ट १६ ते १८ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत पंडित फार्म्स, पुणे येथे पार पडले. सोलापूरची संस्कृती, सोलापूरची अफलातून खाद्य जत्रा, सोलापूरच्या दिग्गज मंडळींची मांदियाळी, मनमुराद खरेदी आणि बरंच काही अनुभवण्यासाठी सहकुटुंब अवश्य भेट द्या.

सोलापूर फेस्ट, इथे सगळंच आहे बेस्ट!

Share: