वेळापूर - बीबी दारफळ

वेळापूर माळशिरस तालुक्यात पंढरपूर ते पुणे या मार्गावर वेळापूर येथील मंदिर हे प्रेक्षणीय आहे. हे मंदिर यादवकालीन असून, त्यात शिव आणि पार्वती यांची मुखे एकाच दगडात कोरलेली आहेत. त्यामुळे या मूर्तीला ङ्गअर्धनारीनटेश्वरफ असे म्हटले जाते. या गावात अनेक वीरगळही आहेत. यादवकालीन शिलालेख उपलब्ध आहेत. 

बीबी दारफळ बीबी दारफळ येथील हजरत अल्लाउद्दीन बाबा दर्गा हा 400 वर्षे जुना आहे. दरवर्षी होत असलेल्या उरुसच्या निमित्ताने जिल्ह्यातून व राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. सोलापूर जिल्ह्यातील हा सर्वात जुना दर्गा समजला जातो.

Share: