हैद्रा

अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा हे स्थान महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. सुफी संत हजरत ख्वाजा सैफुल मालुक चिस्ती यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे ठिकाण आहे. दर गुरुवारी आणि अमावास्येला भाविकांची येथे मोठी गर्दी असते. हिंदू आणि मुस्लिम समाजाचे ऐक्य येथे पाहायला मिळते. या दर्ग्याच्या आवारात एक अष्टकोनी विहीर आहे. अक्कलकोटहून नागणसूरमार्गे हैद्रा येथे जाता येते. हैद्रा गावची सीमा कर्नाटकशी जुळलेली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या दर्ग्यामध्ये अनेक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. अक्कलकोट तालुक्यातील इतर गावांप्रमाणे हैद्रा हे गावही कन्नड भाषिक आहे.

Share: