पंढरीत तुळशी वृंदावन

सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी विविध राज्यांतून लाखो भाविक येतात. वारकरी सांप्रदायमध्ये तुळशीचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच पंढरपूर येथे तुळशीच्या 12 पैकी तब्बल आठ प्रजातींची लागवड वनविभागाने केलीय. नमामि चंद्रभागा योजनेंतर्गत यमाई तलाव परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी चार कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर असून, एक कोटी 29 लाखांचा निधी वर्ग केला आहे. श्रीयंत्राच्या आकारामध्ये तो परिसर सुशोभित करण्यात येणार असून प्रमुख आठ संतांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. प्रत्येक मंदिरासमोर तुळशीची एक प्रजाती लावण्यात येईल.

Share: