सिद्धेश्वर वनविहार

शहराच्या भोवती दोनशे हेक्टर राखीव वनक्षेत्र असणारे मुंबईनंतर सोलापूर हे राज्यातील दुसरे शहर आहे. या ठिकाणी कोल्हा, खोकड, मोर, घोरपड, ससे यांसह अनेक स्थानिक स्थलांतरित पक्षी आढळतात. दुर्मिळ औषधी वनस्पती येथे आढळतात.

शहरापासून अवघ्या दहा किलोमीटवर सिद्धेश्वर वनविहार हे राखीव वनक्षेत्र आहे. शहराच्या भोवती दोनशे हेक्टर राखीव वनक्षेत्र असणारे मुंबईनंतर सोलापूर हे राज्यातील दुसरे शहर आहे. या ठिकाणी कोल्हा, खोकड, मोर, घोरपड, ससे यांसह अनेक स्थानिक स्थलांतरित पक्षी आढळतात. दुर्मिळ औषधी वनस्पती येथे आढळतात. वनविभागतर्फे येथे विविध सोयी-सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक घटकाला आवश्यक बाबींचा समावेश करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. पूर्वी ओसाड माळरान अशी सिद्धेश्वर वनविहारची ओळख होती. शहर परिसरात पकडलेले साप त्या ठिकाणी सोडण्यात येत असल्याने वनविहारकडे अनेकजण फिरकतही नव्हते. गेल्या काही वर्षांत येथे निसर्ग परिचय केंद्र निर्माण करण्यात आले. औषधी उद्यान, लतावन, जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून ओढ्यांचे रुंदीकरण करण्यात आले. तलावातील गाळ काढल्याने पाणपक्ष्यांची संख्या तेथे वाढत आहे. त्याचबरोबर गवताळ भाग, मातृवृक्षांची लागवड, अद्ययावत रोपवाटिका तयार करण्यात आली. बालकांसाठी खेळणी बसवण्यात आली असून पक्षीनिरीक्षणासाठी मनोरे, पर्यटकांना विसावा घेण्यास पॅगोडा बाकडे तयार केले आहेत. गवताळ माळरानावर आढळणारा माळढोक पक्षी, काळवीट यांचे पुतळे तयार केले आहेत. त्याचप्रमाणे वन्यजीव, झाडे, पर्यावरण या संदर्भातील जनजागृती फलक जागोजागी लावण्यात आलेत. निसर्गप्रेमींच्या सहभागातून वनविहरात पक्ष्यांची कृत्रिम घरटी बसवली असून त्यातील अनेक घरट्यांत पक्ष्यांचा वावर सुरू आहे. येथे पर्यावरण शिक्षणाचे केंद्र साकारण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी पर्यावरण शिक्षण केंद्र उभारण्याची संकल्पना मांडली. त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या नव्याने करावयाच्या कामांची (सेंटर ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन) पाहणी केली होती.

विजापूर रोडवर राजस्व नगरकडे जाणार्‍या रस्त्यावर सिद्धेश्वर वनविहार आहे. मोठ्या प्रमाणात झाडी असलेल्या या परिसरात दुपारच्या वेळी थंड वाटतं. परिवारासह जेवणाचा डबा घेऊन भटकंती करायला जाण्यासाठी हे एक छान ठिकाण आहे.

Share: