गुरुदेव रानडे आश्रम निंबाळ

आध्यात्म आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात निंबाळ येथील गुरूदेव रानडे आश्रम प्रसिद्ध आहे. विजयपूर महामार्गावरील होर्ती येथून डावीकडे 10 किलोमीटर अंतरावर हे आश्रम आहे. रेल्वेनेही निंबाळला जाता येते. पहाटे 5 वाजल्यापासून अनेक गाड्या आहेत. मन:शांती, आध्यात्मिक साधना यात रुची असणारे साधक नियमितपणे निंबाळला जातात. रा. स्व. संघाचे सरसंघचालक श्री. मोहन भागवत हेही वर्षातून काही दिवस या आश्रमात राहून साधना करतात. केवळ महाराष्ट्र आणि कर्नाटकातच नव्हे तर देशात आणि परदेशातही निंबाळ आश्रमाचे साधक आहेत. माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हेही गुरूदेव रानडे यांचे चाहते होते. येथे वर्षातून 5 उत्सव होतात. इतर वेळी नामजप आदी साधना सुरू असते.

अलिकडच्या काळात विजयपूर शहरापासून जवळ असलेल्या शिवगिरी येथे भव्य शंकराची मूर्ती उभारण्यात आली आहे. ही मूर्ती लांबूनच लक्ष वेधून घेते. येथे येणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Share: