प्रेरणाभूमी अस्थिविहार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी महाराष्ट्रात तीन ठिकाणी आहेत. नागपूरमध्ये दीक्षाभूमी, मुंबईत चैत्यभूमी तर सोलापुरात प्रेरणाभूमी आहे. बुधवार पेठेतल्या मिलिंदनगरात अतिशय सुंदर असे हे विहार साकारले आहे. सोलापूरसंदर्भातील मुख्य घटना-घडामोडी शिल्पांच्या स्वरूपात मांडण्यात आल्या. त्यामुळे विहार अधिक बोलके झाले आहे.

या ठिकाणी अनेक दुर्मिळ छायाचित्रे आहेत. यात 22 सप्टेंबर 1924 रोजी हरिभाऊ तोरणे गुरुजी यांनी बाबासाहेबांना दिलेले पत्र, 24 जानेवारी 1937 रोजी बाबासाहेब जीवप्पा ऐवाळे यांच्या प्रचारासाठी सोलापुरात आले असताना रेल्वे स्टेशनवरील स्वागताचे छायाचित्र, 23 फेब्रुवारी 1939 रोजी सोलापुरात महारमांग वतनदार परिषद कार्यकर्त्यांसोबत, 6 ऑगस्ट 1950 पंढरपुरात चोखामेळा बोर्डिंग विश्वस्त जबाबदारी स्वीकारताना, कुर्डुवाडी रेल्वे स्टेशन येथे कार्यकर्त्यांसोबत, माढा तालुक्यातील भोसरे येथील शंकरराव रिकोबे यांनी घेतलेली बाबासाहेबांची भेट, भारतरत्न पदक स्वीकारताना माईसाहेब, वळसंग येथील विहिरीस बाबासाहेबांनी दिलेली भेट यांसह 15 छायाचित्रे आहेत.

Share: